* मतदाते विरोधा पेक्षा काम करणाऱ्याला महत्व देणार,,
तालुका प्रतिनीधी:-वणी
वणी उपविभागात सहकार क्षेत्रातील प्रतिष्ठित दि. वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या 17 सदस्य संचालक मंडळाची निवडणूक येत्या 6 नोव्हेंबर 2022रोज रविवारलाला होऊ घातली आहे. आता फक्त तिन दिवस शिल्लक राहिले असता. निवडणूकी च्या रणधुमाळी रंगत येताना दिसते आहे.सर्वच पॅनल प्रयत्नांची पराकाष्ठा करत प्रचार करत आहे.मात्र सद्या उपविभागात सर्वत्र ” जय सहकार ” पॅनल च सर्वांवर वरचड असल्याचे चित्र दिसत आहे.जय सहकार पॅनल चे सर्व उमेदवार विजयी होईल असा विश्वास ऍड देविदास काळे यांनी व्यक्त केला आहे.

दि वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या वणी, शिंदोला, मार्डी, मारेगाव व मुकुटबन येथे जिनिंग प्रेसिंग युनिट निर्माण करण्यात व संस्थेला पडत्या काळात पुन्हा नव्याने उभं करण्याची किमया ऍड देविदास काळे यांनी करून दाखवली आहे.मतदाते हे शेतकरी असल्याने शव्दाला जाणणाऱ्या बळीराजाची पसंती म्हणजे जय सहकार पॅनलच्या ” छत्री ” या चिन्हावरच मतदान करून पॅनल ला मोठ्या फरकाने विजय करेल.

जय सहकार पॅनलकडून वर्तमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे, विजयभाऊ चोरडिया, राजाभाऊ पाथ्रडकर, प्रशांत गोहोकार, प्रेमकुमार खुराणा, विलास मांडवकर, पवन एकरे, पुंडलिक भोंगळे, संजय पारखी, लुकेश्वर बोबडे, मोहन जोगी, अमोल ठाकरे, सुरेश बरडे, सुनील वरारकर, वंदना भोंगळे, मंदा पाचभाई व नामदेव सुरपाम संचालक पदासाठी निवडणूक लढत आहे.आणि निवडणूक चिन्ह ” छत्री ” आहे.