आता अवघे 72 तास शिल्लक ” जय सहकार ” पॅनल विजया कडे वाटचाल!,,,,

0
39

* डोअर टू डोअर प्रचाराचा होणार मोठा फायदा,,,

तालुका प्रतिनीधी:-वणी

दि. वसंत कॉपरेटिव्ह शेतकरी जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी संस्थेच्या 17 सदस्य संचालक मंडळाची निवडणूक वाढत्या गुलाबी थंडीत ही चांगलीच तापताना दिसत आहे.मागील काही दिवसांपासून सुरू असलेली निवडणूक रणधुमाळी शांत होण्याकरिता आता अवघे 72 तासच शिल्लक राहिले आहे. वसंत जिनिंग चे अध्यक्ष ऍड.देविदास काळे यांच्या नेतृत्वात जय सहकार पॅनल चा विजय जवळपास निश्चित झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.असा विश्वास जय सहकार पॅनल कडून व्यक्त केला जात आहे.

*” जय सहकार ” पॅनलच्या संभाव्य विजयाचे प्रमुख कारणे -*
*डोअर टू डोअर मतदात्याच्या भेटी गाठी – जय सहकार पॅनल प्रचारात मोठ्या प्रमाणावर मेहनत घेत आहे.प्रत्येक मतदात्याच्या गावोगावी व प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची भेट घेऊन आपल्याला पाठिंबा द्यावा या करिता प्रचार केला जात आहे.*

*पॅनल ला उपविभागातील दिग्गज पुढाऱ्यांच्या पाठिंबा -निवडणूक रणधुमाळी सुरू झाली आणि प्रचारचे नारळ फोडताचा जय सहकार पॅनलच्या वतीने उपविभागातील दिग्गज पुढाऱ्यांच्या पाठिंब्याकरीता प्रयत्न करण्यात आले.आज त्यांच्या प्रयत्नाला यश देखील येताना दिसत आहे.अनेक दिग्गज पुढाऱ्यांच्या पाठिंबा मिळत आहे.*

*मीडिया ते सोशल मीडिया वर प्रचारांचा जोर -निवडणूकी दरम्यान प्रचाराचे अनेक माध्यमाचा उपयोग केला जातो.जय सहकार पॅनल च्या वतीने मीडिया आणि सोशल मीडियाचा चांगला उपयोग केला जात आहे.त्यामुळे सर्वत्र ” जय सहकार ” पॅनल आणि ” छत्री ” हे निवडणूक चिन्ह मतदात्यापर्यंत पोहचविण्यात फायदा होत आहे.*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here