मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथील श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयत काल दिनांक 26 नोव्हेंबर 2022 रोज शनिवारला संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक पांडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या समवेत शिक्षक व कर्मचाऱ्यांतर्फे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून संविधानाच्या प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले व भारतीय संविधानाप्रती आपले मनोगत व्यक्त करण्यात आले.
राऊत सर यांनी विद्यार्थ्यांना संविधानाबाबत माहिती दिली. या प्रसंगी कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख मार्गदर्शक यादवरावजी पांडे हे उपस्थीत होते विद्यालयातील शिक्षक व कर्मचारी तसेच सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून शाळेत निंबध स्पर्धा, प्रश्नमंजुषा,भाषण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन देवाळकर सर तर आभार प्रदर्शन पंकज मत्ते यांनी केले.