चंद्रपुर येथे उपचारादरम्यान मृत्यू.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:-गजनान देवाळकर
[8888721480]
मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील एका 44 वर्षीय शेतकऱ्याने कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दुपारी 4 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.
साविस्तर वृत्त असे की..
कैलास नानाजी खोके वय सुमारे 44 वर्ष रा. कुंभा असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याचे नाव असून कैलास हा दिनांक 27 नोव्हेंबर 2022 रोज रविवारला नेहमी प्रमाणे शेतातील कामासाठी गेला होता. दुपारी 4 वाजताच्या सुमारास त्यांनी मोनोशिल नावाचे विषारी कीटनाशक प्राशन केल्याचे शेतात असलेल्या कुटुंबातील काही व्यक्तिच्या लक्षात येताच त्यांनी आरडा ओरड केली.
आजू बाजुच्या शेतातील शेतकऱ्यानी त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठविण्यात आले.पण उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांचे नावाने येथे 9 एकर शेती असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
या वर्षीचा अतिवृष्टी मुळे झाल्येल्या नुकसानी मुळे चिंतेत असताना त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याची चर्चा आहे. मृतक शेतकरी कैलास याच्या पश्चात पत्नी, असा आप्त परिवार आहे.या घटनेने कुंभा गावात शोकाकुळ पसरली आहे.