शेतकऱ्याचा मागण्यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या भजनाच्या गजरात उपोषणाला सुरुवात.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव येथील तहसील कार्यालयासमोर कांग्रेस पार्टी कडून दिनांक 1 डिसेंबर 2022 रोज गुरुवार पासून उपोषनाला सुरुवात करण्यात आली आहे.काल उपोषणाचा दुसरा दिवस होता तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनाकरीता 24 तास विज उपलब्ध करून देण्यात यावे, शेतकऱ्यांचे एजी चे विज बिल संपूर्ण माफ करण्यात यावे.
तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था अतिशय खराब झाली असून नवीन रस्ते योग्य रीतीने करावे, सन 2022-23 चा ओला दुष्काळ व पिक विमा त्वरीत मंजुर करुन शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे,वर्धा नदी लगतच्या पुर पिडीत शेतकऱ्यांना विशेष पॅकेज देण्यात यावे, नियमीत कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांचे 50 हजार प्रोत्साहन अनुदान त्वरीत देण्यात यावे, वन्यप्राण्यामुळे शेतकऱ्यांचे होत असणारे नुकसान व वाघाचा बंदोबस्त त्वरीत करण्यात यावा.
तालुक्यातील शेतकऱ्यांना दुष्काळ निधीचे वाटप 13600/- प्रमाणे त्वरीत देण्यात यावे.कापसाला 12 हजार 500 व सोयाबिन ला 8 हजार 500 हमी भाव देण्यात यावा. अशा विविध मागण्यासाठी काँग्रेस तर्फे उपोषण सुरु करण्यात आले आहे.
या मागण्यासाठी तहसील कार्यालय मारेगाव सामोर भजनाच्या गजरात जो पर्यंत शासन दखल घेणार नाही तो पर्यंत उपोषण चालु राहील.उपोषणकर्ते मारोती माधव गौरकार,प्रफुल तुकाराम विखनकर,अरविंद विठ्ठलराव वखनोर, माणिक लक्ष्मण पांगुळ यांनी दिनांक 1 डिसेंबर 2022 पासून उपोषणाला सुरुवात केली आहे.
काल दिनांक 2 डिसेंबर 2022 रोज शुक्रवारला उपोषणाचा दुसरा दिवस होता. यावेळी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष प्रफुल्ल मानकर, यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नरेंद्र ठाकरे, माजी जि. प. सभापती अरुणा खंडाळकर व अनेक नेत्यांनी उपोषण मंडपास भेटी दिली व आपला पाठिंबा जाहीर केला आहे.