५० मी. लांब, फायर लिंबो स्केटिंग मध्ये जागतिक विक्रम.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगांव तालुक्यातील मूळ गावं चि. बोटोणी येथील,सध्या कोंढवा बुद्रुक, पुणे येथे राहणारी ५ वर्षाची चिमुकली कु. मनस्वी विशाल पिंपरे हिने आंबेगाव, पुणे या ठिकाणी ५व्या वाढदिवसाच्या दिवशी फायर लिंबो स्केटिंग प्रकारामध्ये जागतिक विक्रम केला ,जगातील पहिली ५ वर्षाची मुलगी मनस्वी हिने आगीने ज्वलीत 50 बार 50 मीटर लांब ,अंडर 10 ईंच अंतर अवघ्या 16 सेकंदात पार करून ऐतिहासिक असा जागतिक विक्रम आपल्या नावावर केला आहे.

ज्याची नोंद वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया या बुक मध्ये झाली.मनस्वी सध्या रॉक ऑन व्हील स्केटिंग अकॅडमी येथे स्केंटीगचे प्रशिक्षण घेत असून विजय मलजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली मनस्वीने हा ऐतिहासिक जागतिक विक्रम केला तीच्या यशा मध्ये विजय मलजी सरांचा सिंहाचा वाटा असून, मनस्वीने १३ महिन्याच्या अथक परिश्रमामुळे हे घवघवीत यश मिळवले.

वर्ल्ड रेकॉर्ड इंडियाचे अध्यक्ष पवन सोलंकी सर व त्यांच्या टीमने परीक्षण केले, पिंपरे परिवारा सह भारताचे नाव उंच शिखरावर नेऊन ठेवले. वर्ल्ड रेकॉर्ड इंडिया चे अध्यक्ष पवन सोलंकी सर यांच्या हस्ते मनस्वीला प्रमाणपत्र,मेडल आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आले,मनस्वी च्या अष्टपैलू खेळवृत्तीमुळे आतपर्यंत तिने ५६ सुवर्ण, ६ रजत आणि ६ कास्य पदक पटकाविले असून फक्त ५ वर्ष वयाच्या कालावधीत मनस्वी हिने एका मागोमाग स्केटिंग मध्ये वेगवेगळे प्रावीण्य व यश संपादित केले आहे.
आपल्या ५ व्या वाढदिवशी आई वडीलाला जागतिक विक्रम भेट म्हणून दिले, तिचे सर्वच स्तरातून अभिनंदन होत आहे.