बोटोणी जवळील करंजी- मारेगाव राज्य महामार्गावरील घटना.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव तालुक्यातील बोटोणी गावा पासून अर्धा कि.मी अंतरावर करंजी- मारेगाव राज्य महामार्गावरील भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाच्या धडकेत पायदळ चालणारा एक वृद्ध व्यक्ती जागीच ठार झाल्याची घटना आज दिनांक 13 डिसेंबर 2022 रोज मंगळवारला दुपारी 11:30 वाजताच्या सुमारास ही घटना घडली असुन गोविंदा पांडुरंग खंडरे वय सुमारे (65)वर्षे असे अपघातात जागीच ठार झालेल्या इसमाचे नाव असुन ते बोटोणी येथील रहिवासी आहे.
गोविंदा हे नेहमी प्रमाणे बोटोणी कडून पती -पत्नी दोघे शेता कडे जात असतांना भरधाव वेगाने येत असलेले 4 चाकी वाहने एका दुचाीस्वारांना कट मारल्या मुळे दुचाीस्वारांचे नियंत्रण सुटले दुचाीस्वार व दोन मुले जखमी झाले आहे. या विचित्र अपघातात पायदळ शेताकडे जाणाऱ्या गोविंदा यांना पाठीमागून जबर धडक दिली त्यांच्या पायाला व डोक्याला गंभीर स्वरुची दुखापत झाली व त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती प्राप्त झाली असुन मृतकाच्या पश्चात पत्नी, व एक मुलगा,असा आप्तपरीवार आहे.
या घटनेची माहिती मारेगाव पोलीसांना मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालय मारेगाव येथे पाठविण्यात आला असुन पुढील तपास मारेगाव येथील ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात शुंकुरवार जामदार करत आहेत.