दुर्भा ,सतपल्ली ,वठोली तीन ग्रामपंचायत वर भाजपाचे वर्चस्व तर टाकळी ग्रामपंचायत काँग्रेसकडे.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी:- तालुक्यातील चार ग्रामपंचायतीचा निकाल जाहीर झाला असून सतपल्ली ,वठोली,दुर्भा या ग्रामपंचायती भाजपकडे तर टाकळी येथील ग्रामपंचायत पुनश्च कांग्रेस कडेच आहे ,
दुर्भा येथे प्रिया नरेंद्र नाकले या सरपंच म्हणून भाजपा कडून निवडून आल्या ,त्यांना 477 मते मिळाले तर प्रतिस्पर्धी कांग्रेस च्या संगीता केशव नाकले 316 मते मिळाली आहे ,येथे भाजपा चे 5 सद्स्य व एक सरपंच निवडून आले आहेत.
वठोली येथून भाजपचे खुशकुमार रामलू केमेकार यांना 369 मते मिळाली तर त्यांनी कांग्रेस चे विट्ठल रामलू केमेकार 296 मत मिळाली असून यांचा पराभव केला,येथे 5 सदस्य व 1 सरपंच भाजपा चे निवडून आले.टाकळी येथे कांग्रेसचे दुर्गाबाई भाऊराव बुर्रेवार 577,तर त्यांनी भाजपाचे सुवर्णा अशोक पोतराजवार 404 यांचा पराभव केला,येथे सर्वच कांग्रेस चे उमेदवार निवडून आले आहेत.
सतपल्ली येथे भाजपा चे नंदिनी सुनील सिंदमवार 450 या सरपंच म्हणून निवडून आले.त्यांनी सुनीता व्यंकटेश चंदावार कांग्रेस 354, व अल्विनी गोवर्धन मेंगावार भाजपा फुटीर गट 118 यांचा पराभव केला, या ठिकानी भाजपा 5 व सरपंच 1 असे निवडून आले आहेत.मतमोजणी च्या वेळीं तहसीलदार गिरीश जोशी,निवडणून नायब तहसीलदार एल यु चांदेकार ,नायब तहसीलदार महेश रामगुंडे, नायब तहसीलदार अशोक ब्रम्हणवाडे यांच्या देखरेखीखाली पार पडली ,यावेळी पाटण पोलिसांचा चोख बंदोबस्त होता .


