चंद्रपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू.
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
मो. [9922862184]
मारेगाव तालुक्यातील वनोजा(देवी)येथील सुमारे 60 वर्षीय शेतकऱ्याची कीटकनाशक प्राशन केल्याची घटना काल दिनांक 18 डिसेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली.
सविस्तर वृत्त असे की.
मारेगाव तालुक्यातील आत्महत्यांचे सत्र सतत सुरु आहेत.ते थांबताना मात्र दिसून येत नाही.शासन स्तरावरून यावर कोणत्याही उपाययोजना केल्या जात नाही अथवा या थांबण्यासाठी ठोस पावलेही उचलले जात नाही.
वनोजा(देवी)येथील अधिकराव कृष्णाजी घोरुडे वय सुमारे (60)वर्ष असे आत्महत्या केलेल्या विवाहीत शेतकऱ्याचे नाव असून मिळालेल्या माहिती नुसार अधिकराव कृष्णाजी घोरुडे यांनी दिनांक 18 डिसेंबर 2022 रोज रविवारला सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास स्वतःच्या शेतात विषारी किटकनाशक प्राशन केल्याची माहिती त्यांच्या कुटबियांना मिळताच कुटुंबियांनी तातडीने त्यांना उपचारांसाठी वणी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.
मात्र त्यांची प्रकूर्ती गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरीत करण्यात आले होते.पण उपचारा दरम्यान रात्रीच्या सुमारास चंद्रपूर येथे अधिकरावची प्राणज्योत मालवल्याची माहिती प्राप्त झाली आहे.त्यांचे कडे वनोजा (देवी) येथे गावालगत 8 एकर शेती आहे.
तो शेती करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा सतत होत असलेली नापिकी आणि यावर्षीचा दुष्काळ यामुळे आर्थिकदृष्ट्या तो खचलेला होता.अशातच अधिकरावने आत्महत्येचे पाऊल उचलले असावे अशी चर्चा आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विवाहित मुले, एक मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे.


