हरी भक्त पारायण श्रीकृष्ण पांडे महाराज यांच्या मधुर वाणीने केले भाविकांनी मंत्रमुग्न.
गजानन आसुटकर मारेगाव:-तालुक्यातील नरसाळा ह्या गावाची भाविक गांव म्हणून ओळखल्या जातो.या गावात सतत २५ वर्षा पासून श्रीमद भागवत कथा ज्ञान्ययज्ञ सप्ताहाचे आयोजन केले जाते.
श्री. हनुमान देवस्थान समितीचे अध्यक्ष तथा ग्रामपंचायत नरसाळा येथील उपसरपंच यादवराव पांडे यांच्या सखोल मार्गदर्शनातून गेल्या २५ वर्षा पासून श्रीमद भागवत ज्ञान्ययज्ञ सप्ताह सतत आनंद उत्साहात होत आहेत.या श्रीमद भागवत कथेचे पारायण श्री. श्रीकृष्ण पांडे महाराज (बनारस काशी )यांच्या मधुर वाणीतून ते उपस्थिताना मंत्रमुग्न करीत आहेत.

त्यांना साथ देण्यासाठी त्याचे समूह सोबतीला आहेत. या सातही दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाने गावातील वातावरण कसे भाविक, आनंदमय व उत्सहाचे दिसून येते.सायंकाळी ७ वाजता हरिपाठ या कार्यक्रमात गावातील लहान मुलापासून ते मोठया माणसापर्यंत सर्वच भाग घेवन हरिपाठचा आनंद घेतात.त्या नंतर भारूड हा कार्यक्रम होतो.
त्यात जनजागृती चे विषय घेवून उपस्थित लोकांचे मनोरंजन करून जनजागृती केली जातात.या सर्व कार्यक्रमाचे आयोजन नरसाळा येथील श्री.हनुमान देवस्थान समितीचे सर्व पदाधिकारी, सदस्य,महिला भजन मंडळ,वारकरी भजन मंडळ,गुरुदेव भजन मंडळ यांचे खूब मोठे योगदान लाभलेले असतात.