सबंधित विभागाचे दुर्लक्ष ये-जा करणाऱ्या नागरिकांत रोष.
सुरेश पाचभाई मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा (ख) ते हटवांजरी या रस्त्यावर मागील दोन दिवसापासून एक झाड पडून आहे. परंतु दोन दिवस उलटून गेले तरी अजून पर्यंत झाड उचलल्या न गेल्याने नागरिकांमध्ये रोष उत्पन्न होत आहे. हे पडलेले झाड उचलायची जबाबदारी कोणाची हा प्रश्न नागरिक विचारतांना दिसत आहे.
तालुक्यातील आदिवासी गावांना जोडणारा बुरांडा (ख.) ते हटवांजरी हा रस्ता समोर आदिवासी गावांना जोडला जातो.या रस्त्यावर दिनांक 4 एप्रिल 2023 रोज मंगळवारला दुपारी 3 ते 4 वाजता हवेच्या झोक्याने एक झाड पडले.हे झाड बुरांडा गावापासून सुमारे 300 मिटर अंतरावर पुला जवळ एक काटेरी सुबाभळीचे झाड रस्त्यात आडवे पडलेले आहे.

“पण 24 तासच्या वर वेळ होऊनही ते झाड रस्त्यात जसेच्या तसे पडलेले आहे हे विशेष.”त्या मुळे ये-जा करणाऱ्याला मोठ्या प्रमाणात कसरत करत आपले वाहन त्या ठिकाणावरुण काढावे लागत आहे.आणि रात्रीच्या वेळी त्या झाडामुळे दुचाकी किंवा चारचाकी गाडीचा अपघात होऊन एखाद्याला अपंगत्व येण्याची दाट शक्यता आहे.
मात्र संबंधित विभाग गाढ झोपेत असल्याचे नागरिकांकडून बोलल्या जात आहे.व त्या झाडामुळे अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सबंधित विभागाने लवकरात लवकर त्या झाडाचा बंदोबस्त करून रस्ता सुरळीत सुरू करून द्यावा अशी परीसरात नागरिकांची मागणी आहे.


