सुरेश पाचभाई मारेगांव.
कुमारीकेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला.जेव्हा लग्नाचा आग्रह केला त्यावेळी नकार देऊन तो मी नव्हेच म्हणणाऱ्या आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सविस्तर वृत्त असे की.
मारेगांव तालुक्यातील एका गावातील कुमारीकेचे इंदिराग्राम (नगारा पोड) येथील गणेश अभिमान आत्राम वय 26 या व्यक्तीवर प्रेम जडले.भेटीगाठी वाढल्या.प्रेम वाढत गेले.अशातच शारीरिक ओढ निर्माण झाली.दोघांनाही शारीरिक आकर्षण निर्माण झाल्याने त्याचे रूपांतर लैंगिक संबंधामध्ये झाले.
यातील आरोपी पीडितेला अधामधात भेटायचा,शारीरिक भूक भागवायचा.यावेळी मात्र तो नेहमीप्रमाणे माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे.आणि मी तुझ्याशी लवकरच लग्न करणार आहोत असे आश्वासन देत राहायचा.असाच काही कालावधी लोटला.लग्नाचे आमिष देऊन वर्ष लोटले.पण लग्नाचा दिवस मात्र उजाडला नाही.
पीडितेने त्याला अनेकदा विचारणा केली तर हो लवकरच लग्न करतो म्हणणारा प्रियकर दिनांक.4 एप्रिलला मी तुझ्याशी लग्न करत नाही.तुझ्याच्याने जे होते ते कर असे म्हणाला.यावरून पीडित कुमारीकेने आपली फसगत झाली आहे असे लक्षात येताच सरळ मारेगाव पोलीस ठाणे गाठले आणि आरोपीविरुद्ध तक्रार दाखल केली.
यावरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपीविरुद्ध कलम 376,376(2), (n),417,506 नुसार गुन्हा नोंदकरण्यात आला असून या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांच्या मार्गदर्शनात अजय वाभिटकर,रजनीकांत पाटील करत आहे.


