तालुक्यातील पाच शाळेचा निकाल 100%
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल आज दिनांक २ जून २०२३ रोज शुक्रवारला दुपारी १ वाजता ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला.असून यात मारेगाव तालुक्याचा निकाल ९२.९७% इतका लागला असुन पाच शाळांची टक्केवारी १००% आहे.
इयत्ता दहावीची परीक्षा २ मार्च २०२३ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली.नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाल्याने विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनाचा टर्निंग पॉईंट असलेल्या दहाव्या वर्गाचा निकाल कधी जाहीर होणार…? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे डोळे लागले असता अखेर निकालाची प्रतीक्षा संपत आज दुपारी एक वाजता ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला.
मारेगाव तालुक्यातुन ९८२ विद्यार्थ्यांनी परीक्षेचे आवेदन भरले होते. त्यापैकी ९६८ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. यात ९०० विद्यार्थी उत्तीर्ण झाले असुन तालुक्याच्या निकालाची टक्केवारी ही ९२.९७% इतकी आहे.त्या मध्ये संत गजानन महाराज विद्यालय नरसाळा १००%, बलाजीपंत चोपणे माध्यमिक विद्यालय बोटोनी १००%, स्व.लक्ष्मीबाई मोघे विद्यालय,जळका १००%, नेताजी सुभाष चंद्र बोस विद्यालय, म्हैसदोडका १००%, संकेत माध्यमिक विद्यालय गौराळा १००% या शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
तर जिवन विकास माध्यमिक विद्यालय हटवांजरी ९२%,आदर्श हायस्कूल मारेगाव ९६.१५%, पंचशील हायस्कूल नवरगाव ९४.८७%, आदर्श हायस्कूल मार्डी ८२.०५%, कै.दामोधर पंत कन्या विद्यालय मारेगाव ९४.७३%, भारत विद्या मंदीर कुंभा ८६.९०%, श्री.जगन्नाथ महाराज हायस्कूल वेगाव ९०.६२%, राष्ट्रीय विद्यालय हिवरा (मजरा)९०.६२%, शासकिय पोस्ट बेसिक आश्रम शाळा बोटोणी ९५.४५%, श्री.दर्शनभारती विद्यालय गोंडबुरांडा ९२%, राष्ट्रीय विद्यालय मारेगाव ९५.१५%,
महात्मा ज्योतिबा फुले विद्यालय मारेगाव ८८.८८%, के.बि.सि.विद्यालय चिंचमंडळ ७९.३१%, युगांतर पोस्ट बेसिक आश्रम शाळा कांन्हाळगांव ७९.१६%, कै.गिरजाबाई विद्यालय पिसगाव ७८.२६%, संकेत माध्यमिक विद्यालय सराटी९३.७५%, विद्या निकेतन इंग्लिश मिडीयम हाय स्कूल मारेगांव ९८.३८%, स्व.चिंधुजी पुरके आश्रम शाळा मारेगांव ९३.३३%,या शाळांच्या निकालाची टक्केवारी ही शंभरच्या खाली आहे.
जूनपर्यंत करता येणार गुणांची पडताळणी-निकालानंतर विद्यार्थ्यांना स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणीविषयांव्यतिरिक्त) इतर कोणत्याही विशिष्ट विषयांत विद्यार्थ्याला गुणांची पडताळणी,उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत,पुनर्मूल्यांकन किंवा स्थलांतर प्रमाणपत्रासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने स्वतः किंवा शाळामार्फत अर्ज करता येईल.


