सौरव प्रविण आस्वले 94.40% विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल मारेगाव तालुक्यातून प्रथम.
कु.संबोधिनी श्रीधर कयापक 93.20 % मारेगांव तालुक्यातून द्वितीय.
कु.साक्षी विजय बुच्चे 89.60% ही शाळेतून तिसरी
मारेगांव तालुका प्रतिनिधी:- सुरेश पाचभाई
[9922862184]
मारेगाव येथील सौरव प्रविण आस्वले याणे दहावीच्या बोर्डाच्या परीक्षेत 94.40% गुण प्राप्त करून गावासह तालुक्याचे नाव सोनेरी अक्षरात कोरले आहे.

सौरव हा मारेगाव येथील विद्यानिकेतन इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज सायन्सच्या विद्यार्थ्यांनी एस.एस.सी मार्च 2023 च्या परीक्षेत घवघवित यश संपादन केले आहे.तर कु.संबोधिनी श्रीधर कयापाक 93.20% गुणासह तालुक्यातुन दुसरी आलेली आहे आणि कु.साक्षी विजय बुच्चे 89.60%गुण घेऊनशाळेतुन तिसरीआली.शाळेतून 62 विद्यार्थी परीक्षेला बसले होते.
त्यापैकी 40 विद्यार्थी प्राविण्य श्रेणीत उत्तीर्ण झाले व उर्वारित विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले.त्यांनी घेतलेली ही भरारी खरंच कौतुकास्पद आहे.दैदीप्यमान यश संपादन करणाऱ्या सौरव व संबोधिनी आणि साक्षी यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.
सर्व विद्यार्थी हे श्रेय आई वडीला सह शाळेतील मुख्याध्यापका सह शिक्षक यांना देत आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचे शाळेच्या अध्यक्ष संध्याताई राजेश पोटे, मुख्याध्यापिका कु.ज्योत्स्ना बोंडे, प्रफुल पिदूरकर,महेश ढेंगळे ,कुनाल गेडाम,संतोष बदकी यांनी अभिनंदन केले


