फरार आरोपी एसीबीच्या जाळ्यात.

0
42

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी जामणी रेतीचे दोन वाहन : महसूल व पोलिसांनी पकडल्याप्रकरणी ते वाहन सोडण्यासाठी मुकूटबन येथील पोलीस शिपाई आणि दोन साजा मधील दोन तलाठी व एक मंडळ अधिकारी यांनी पन्नास हजाराची लाच मागितली होती.

लाच दिल्यानंतरच पोलीस विभागाची आणि महसूल विभागाची कारवाई थांबविता येऊ शकते असे सांगून रेतीची वाहतूक करणाऱ्या व्यक्तीकडून ५० हजाराची लाच स्वीकारली लाच स्वीकारण्याच्या पुराव्यावरून यवतमाळ लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाऱ्यांनी पोलीस शिपाई आणि दोन तलाठी व एक मंडळ अधिकारी यांच्याविरुद्ध लाचखोरी अंतर्गत १७ फेब्रुवारी२०२३ गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली होती.यातील एक आरोपी होमगार्ड फरार होता त्याला बुधवारी अटक करण्यात आली.

दिनांक २३ सप्टेंबर २०२२ दरम्यान संजय खांडेकर पोलीस नाईक, नमो शेंडे तलाठी, रमेश राणे तलाठी, बाबुसिंग राठोड मंडळ अधिकारी व होमगार्ड प्रज्योत ताडुरवार यांनी तक्रारदार खंडाळे यांना त्यांचे वाहन क्रमांक एम. एच. ३४ बीजी ६४८४ व एमएच ३४ एव्ही ००१९ मधील रेतीचे रॉयल्टी वाहतूक परवाना परत करून गाड्या सोडण्याकरीता तसेच कोणतीही कारवाई न करणेकरीता आपसात सर्वामीळुन चर्चाकरून तडजोडीअंती सर्वाकरीता एकत्रीत ५० हजार रूपये लाचेची मागणी करून लाच रक्कम स्विकारण्याचे मान्य

केले. तसेच संजय खांडेकर पोलीस नाईक, नमो शेंडे, तलाठी यांना लाच मागणी करीता सहकार्य केले. रमेश राणे व बाबुसिंग राठोड यांनी ऑनलाईन लाचरक्कम देण्याबाबत सुचवून गुन्हयात सहकार्य केले. प्रज्योत ताडुरवार होमगार्ड सैनिक यांनी त्यांचे ताब्यात असलेल्या दोन्ही रेतीच्या गाडयाच्या चाब्या व रॉयल्टी वाहतूक परवाना पंचासमक्ष परत केल्याने तसेच पोलीस नाईक यांना सदर गुन्हयात सहकार्य केल्याने १७ फेब्रुवारी २०२३ ला पो. स्टे. मुकूटबन येथे कलम ७, १२ भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता परंतु प्रज्योत ताडुरवार हा फरार होता. यानंतर ०६ ताडुरवार हा फरार होता. यानंतर ०६ जून २०२३ रोजी सदर गुन्हयातील जून २०२३ रोजी सदर गुन्हयातील पाहिजे असलेला मुकुटबन येथील यवतमाळ यांनी केले आहे.

प्रज्योत वसंतराव ताडुरवार हा पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे चालक प्रशिक्षण घेत असल्याचे समजल्याने प्रज्योत वसंतराव ताडुरवार याला साडे तीन महिन्यानंतर पोलीस मुख्यालय यवतमाळ येथून ताब्यात घेवुन ०७ जून २०२३ रोजी पोलीस स्टेशन मुकूटबन येथे अटक करण्यात आली.

अशी माहिती उत्तम नामवाडे पोलीस उपअधीक्षक अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ यांनी प्रेस नोटद्वारे दिली.शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत अॅन्टी करप्शन ब्युरो यवतमाळ कार्यालयास दरध्वनी क्रमांक ०७२३२-२४४००२ तसेच टोल फ्रि क्रमांक १०६४ वर संपर्क करण्याचे आव्हान पोलीस उप अधिक्षक, अॅन्टी करप्शन ब्युरो,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here