शेतकरी पुत्राची कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या.

0
60

पेंढरी येथील घटना.

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव तालुक्यातील पेंढरी येथील एका शेतकरीपुत्राने विषारी कीटकनाशक प्राशन करून जीवन संपविले.समाजमन सुन्न करणारी ही घटना पेंढरी येथे घडली.ही घटना काल सायंकाळी 5:30 वाजता उघडकीस आली.

असून आत्महत्या करणाऱ्या शेतकरी पुत्राचे नाव निकेश तुळशीराम आत्राम वय 18 वर्षे असे आहे.निकेश हा अविवाहित आहे.त्यांची घरची हलाखीची परिस्थिती आहे.त्याचे वडिलांच्या नावाने 5 एकर शेती आसल्याची माहिती मिळाली आहे.

घरची बेताची परिस्थिती आणि होत नसलेले उत्पन्न यामुळे वडील नेहमी चिंतेत दिसायचे.याचे त्याला दुःख व्हायचे.तो काल दि. 6 जुन 2023 रोज मंगळवारला तो घरी शेतात जातो म्हणुन सांगून गेला पण सायंकाळी 5 वाजले तरी तो घरी परतला नाही म्हणून वडील व काही नातेवाईकांनी त्याच्या गावात शोधा शोध घेतला पण तो दिसला नाही.

काही वेळात ते शेताकडे गेले असता सोयाम यांचे शेता जवळ त्यांना मुलगा पडलेल्या अवस्थेत दिसला हि घटना काल सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली.वडिलांनी स्वतः जाऊन पाहिले असता त्यांच्या मुलाने कोणतेतरी विषारी कीटकनाशक प्राशन केल्याचे लक्षात येताच त्यांनी घटणेची माहिती गावातील पोलीस पाटील यांना दिली व त्यांनी लगेच सदर माहिती मारेगांव पोलिस स्टेशनला दिली.

माहिती मिळतात मारेगांव पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्याला लगेच मारेगांव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले पण तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले.निकेशच्या मागे आई,वडील,एक भाऊ एक बहीण असा आप्त परिवार आहे.

बातमी लिहे पर्यंत आत्महत्येचे नेमके कारण कडु शकले नाही.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here