एका दारूड्यासाठी.
तालुका प्रतिनिधी वणी,
वणी तालुक्यातील एका गावातील राजू हा दारू पिवुन घरी भांडण करीत होता.भांडणे करणे हा त्याचा कुटुंबात नेहमीचा विषय झाला होता त्याचा पिण्याचा कहरच झाला आणि त्याने एक दिवस दुपारी खुप दारु पिली व पत्नी व मुलीसोबत भांडण झाले त्याची मुलगी 16 वर्षाची हिने वणी पोलीस स्टेशनला फोन केला काही वेळातच पोलीसाची गाडी घरी आली.
आणि कुटुबातील सर्व मेंबरला पोलिस स्टेशन वणी येथे हजर होण्यास सांगितले सर्व सदस्य हजर पण झाले त्यावेळी ठाणेदार प्रदीप शिरसकर यांनी त्यांच्या सर्व व्यथा ऐकूण घेत त्यांनी संजीवनी व्यसनमुक्ती केंद्रात फोन केला आणि तेथील कर्मचाऱ्याला बोलावून त्याला व्यसनमुक्ती केंद्रात भरती केले.

त्यानंतर काही दिवसात राजुच्या जीवनात पूर्ण पणे बदल घडून आला असुन आज,तो पुर्ण पने मद्याविरहित जिवन जगत आहे आणी त्यांचे जीवन आनंदी आहे. हे सर्व ठाणेदार प्रदीप शिरसकर यांचे मुळे शक्य झाले म्हणुन राजूच्या कुटुंबीयांसाठी ते देवदूत ठरले आहे.ठाणेदार प्रदीप शिरसकर यांनी संजावनी व्यसनमुक्ती केंद्रात भेट दिली तेव्हा राजूनी ठाणेदार प्रदीप शिरसकर यांचे आभार मानले. यावेळी ठाणेदार यांचा सत्कार करताना राजेश भोयर व भगवान पाचभाई उपस्थित होते.


