मारेगाव येथील राज्य महामार्गाच्या कडेला आढळला मृतदेह.
सुरेश पाचभाई मारेगांव,
मारेगांव येथील राज्य महामार्गावर लोढा हॉस्पिटलच्या कडेला अर्जुनी येथील पंजाब आत्राम वय सुमारे 32 वर्ष या युवकाचा मृतदेह काटेरी झुडपात आढळल्याने एकच खळबळ उडाली असुन हि घटना आज दिनांक 22 जुन 2023 रोज गुरुवारला दुपारी 3:30 वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे.

काही नागरिक त्या मार्गाने जात असताना त्यांना सदर मृतदेह दिसून आला.त्यांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली.माहिती मिळताच मारेगांव पोलिस घटनास्थळी दाखल झाले व घटनेचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.
सदर इसमाचा मृत्यू नेमका कशाने झाला या बाबत वृत्त लिहेपर्यंत माहीती मिळाली नसुन उत्तरीय तपासणी नंतरच मृत्यूचे कारण कळणार असुन या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात जमादार आनंद अचलवार करीत आहे.


