दुचाकीस्वार घटनास्थळावरून पसार.
बिटोणी येथील राज्य महामार्गावर गतीरोधक जवळील घटना.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर बोटोणी येथून सिमेंट घेऊन करंजी कडे जाणाऱ्या ट्रकने दुचाकीने जात आलेल्या दुचाकीवर मागे बसलेल्या व्यक्तीला बोटोणी येथे गती रोधकजवळ चिरडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची ही घटना आज दिनांक 28 जुन 2023 रोज बुधवारला सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास बोटोणी येथील राज्यमहामार्गावर घडली.
आज सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास बोटोणी येथील राज्य महामार्गावर गती रोधकजवळ दुचाकीवरून उसळून ट्रकच्या चक्यात येवून एक व्यक्ती जागीच ठार झाला तर त्याचा सहकारी दुचाकी क्रमांक MH.26 U.9511 हा दुचाकी घेऊन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती आहे. रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले.

असुन सदर ट्रक हा मारेगांव कडून सिमेंट घेऊन करंजी जाणारा ट्रक क्रमांक MH.21 BH.7770 ने दुचाकीवरील मागे बसलेल्या व्यक्ती उसळून पडल्याने ट्रकच्या चाकात येवुन त्याचा जगीच मृत्यू झाला असुन अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव बातमी लीहे पर्यंत कळू शकले नाही.
मारेगांव पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुण ट्रक ताब्यात घेतला असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.


