अपघात अपडेट..अखेर त्या बोटोणी जवळील अपघातातील मृत व्यक्तीची ओळख पटली.

0
57

मोटर सायकल चालकावर मारेगांव पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,

मारेगांव तालुक्यांतील बोटोणी येथे काल दिनांक 28 जुन 2023 रोज बुधवारला सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास राज्यमहामार्गावर बोटोणी येथे झालेल्या अपघातातील मृत व्यक्तीचा सहकारी हा घटनास्थळावरून मृत व्यक्तीचा मोबाईल पॉकिट व दुचाकी घेवुन पसार झाला होता.त्या मूळे मृतक व्यक्तीचे नाव कडु शकले नाही पण आज त्या अपघातातील मृतक व्यक्तीची अखेर ओडख पटली आहे.

हिरामन भीमाजी बोचेकर वय सुमारे 40 वर्ष रा.वाढोणा ता.कळंब जि.यवतमाळ असे त्या अपघात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव असुन काल सायंकाळी 6:30 वाजताचे सुमारास बोटोणी येथील राज्य महामार्गावर गती रोधकजवळ दुचाकीवरून उसळून ट्रकच्या चक्यात येवून ते जागीच ठार झाले होते.

काल ते दुचाकी क्रमांक MH.26 U.9511 वर मागे बसुन जात होते त्यांच्या सहकारी हा त्याच्या ताब्यातील मोटर सायकलने वणी – मारेगाव कडुन करंजी कडे डबल सिट मोटर सायकलने भरधाव वेगाने व निष्काळजीपने जात असतांना मागे बसलेला व्यक्ती हा मोटर सायकल वरून उसळुन रोडवर पडला व ट्रक क्र. MH.21 BH.7770 या ट्रकचे चाकात येवुन जागीच ठार झाला होता.

त्या मुळे मोटर सायकल क्रमांक MH.26 U.9511 चा चालक याचेवर कलम 279, 304 (अ) भादवी 134, 177 मोटर वाहन कायद्या नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन

सदर घटनेची माहिती रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी मारेगांव पोलिसांनी दिली होती.माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले व पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुण ट्रक ताब्यात घेतला होता व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला होता.

उत्तरीय तपासणी नंतर आज दिनांक 29 जुन 2023 रोज गुरुवारला मृतदेह नातेवाईकांकडे सुपूर्द करण्यात आला.या प्रकरणाचा पुढील तपास ठाणेदार राजेश पुरी यांचे मार्गदर्शनात जामदार किसन सुंकुरवार करत आहे.




LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here