भरधाव अज्ञात वाहनाच्या धडकेत पायदळ जाणारा मजुर जागीच ठार.

0
65

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील शिवनाळा बस स्टॉप जवळील घटना.

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगांव,

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावर शिवनाळा बस स्टॉप जवळ भरधाव अज्ञात वाहनाने पायदळ जाणाऱ्या मिस्त्री काम करणाऱ्या मजुराला जबर धडक दिली व पसार झाला असुन पायदळ जाणारा मजूर हा जागीच ठार झाला आहे ही दुर्दैवी घटना आज दिनांक 30 जुन 2023 रोज शुक्रवारला रात्री 10 वाजताचे सुमारास राज्यमहामार्गावर शिवनाळा बस स्टॉप जवळील घटना घडली.

अनिल कृष्णराव टेकाम वय सुमारे 24 वर्ष रा.शिवनाळा ता. मारेगाव जि.यवतमाळ असे अपघातात मृत्यू झालेल्या मजुराचे नाव आहे.तो आज रात्री 10 वाजताचे सुमारास मारेगांव येथून मिस्त्री काम मजुरी करून नेहमी प्रमाणे शिवनाळा आपल्या गावाकडे पायदळ जात असताना राज्य महामार्गावर शिवनाळा बस स्टॉप जवळ भरधाव अज्ञात वाहनाने जबर धडक दिली व पसार झाला या अपघातात तो जागीच ठार झाला.अपघात इतका भीषण होता की, यात मृतकाचे डोके चेंदामेंदा झाल्याचे जमावानी सांगितले.

रस्त्यांनी ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी घटनेची माहिती मारेगांव पोलिसांनी दिली माहिती मिळताच मारेगांव पोलीस घटनस्थळी दाखल झाले.व पोलिसांनी घटनास्थळ पंचनामा करुन मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मारेगाव येथील ग्रामिण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.अनिल यांचे वडीलचे मागच्या वर्षी दिर्घ आजाराने निधन झाले होते मृत अनिल यांचे पश्चात आई,एक विवाहीत बहीण असुन त्याचे असे अवेळी जग सोडून गेल्याने गावा सह परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या प्रकरणाचा पुढील तपास मारेगांव पोलीस करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here