ऐण पेरणीच्या वेळी शेतकऱ्यांना त्रास,विद्यार्थीवाहन येण्यास अडचण.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी तालुक्यातील सिंधीवाढोना ते डोंगरगाव रस्ता दुरुस्तीचे काम नुकतेच करण्यात आले.त्याच रस्त्यावर पुलाचेही बांधकाम करण्यात आले आहेत.ऐेण पावसाळ्यात पुलाचे काम पूर्ण केले पण पुलाच्या दोन्ही बाजूला लाल मातीचा भराव टाकण्यात आला आहे.मात्र आता साधारण पावसाने चिखल झाल्याने वाहतूकीचा खोळंबा होत आहे .
डोंगरगाव या गावाला जोडणारा हा एकमेव रस्ता आहे ह्या शिवाय दुसरा पर्याय नाही.जनतेला रहदारीचा रस्ता असल्याने या रस्त्याने डोंगरगाव वासीयांना आठवडी बाजार कायर,मुकुटबन,येथे या रस्त्याने ये – जा करावी लागतात. मागील चार ते पाच वर्षा पासून रस्ता दुरुस्ती मागणी करण्यात येत होती.बऱ्याच दिवसाच्या प्रतिक्षेनंतर नुकतेच रस्त्याचे डांबरीकरण काम पूर्ण झाले आहे.

जुना रपटा काढून नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.पण पुलाजवळ दोन्ही बाजूला सुमारे शंभर फूट काम बाकी असून पुलाच्या दोन्ही बाजूला लाल माती मिश्रीत मुरूम, टाकण्यात आला आहेत.त्यामुळे पुलावर पूर्णतः चिखलाचे साम्राज्य पसरले असून रस्त्याने जाणे येणे मोठे अवघड झाले आहेत.
लाखो रुपये खर्च करून हा पुल जनतेच्या सुविधेसाठी बनवण्यात आला असाला तरी आज वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे.वाहनाचे चाके या मातीत रुतत असून वाहन पूढे जाणे कठीण झाले आहे.दुचाकी वाहन काढतां वेळेस गाडी स्लीप होऊन मोठा अपघात होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही.हा पुल पूर्णत्वात आला असून त्यावर खडीकरण व डांबरीकरण अत्यंत गरजेचे होते परंतु आजपर्यंत कंत्राटदारांनी पुलावर डांबरीकरण न केल्यामुळे पुल हे पूर्णतः चिखलमय झाला आहे.
त्यामुळे संबंधित लोकांना जाणे येणे करण्याकरिता नाहक त्रास सहन करावा लागत आहे.सध्या शेतीचा खरीपाच्या पेरणीचा हंगामची लगबग सुरू आहे . शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे आणण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.३० जून पासून शाळा सुरू होत आहे.
या गावातील विद्यार्थी मुकुटबन,कोसारा व कायर या गावी जावून शिक्षण घेत असून विद्यार्थी वाहन गावात येण्यास मोठी अडचण निर्माण होत आहे.कुठलीही अनुचित घटना घडू नये याकरिता या पुलावरील अपूर्ण बांधकाम हे तात्काळ करून मार्ग हा सुरळीत करण्यात यावा.व संबंधित विभागाने जाणीवपूर्वक लक्ष द्यावं अशी मागणी निलेश बेलेकार युवासेना तालुका प्रमुख यांनी केली आहे.