करणवाडी येथे जिल्हाधिकारी यांनी शेतकऱ्याच्या बांधावर येवून केली पिक पाहणी.

0
85

ऑनलाईन ई पीक पाहणीची दिली शेतकऱ्याना माहिती.

विदर्भ एस. पि. न्युज नेटवर्क मारेगांव,

मारेगाव तालुक्यातील करणवाडी येथे आज दिनांक 17 जुलै 2023 रोज सोमवारला सायंकाळी 5:30 वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी करणवाडी येथील शेतकरी श्रीधर काळे याच्या शेतात भेट दिली.

व त्यांचे शेतात पिकाची पाहणी करण्यात आली.शेतात पीक पाहणी करीत असताणा गावातील शेकऱ्याच्या समस्या जाणून घेतल्या.शेतकऱ्यांना मागील वर्षी विमा कंपन्यानी विमा दिला नसल्याची तक्रार काही शेतकऱ्यांनी केली असता त्यावर जिल्हाधिकारी यांनी मारेगाव तालुक्यातील एकुण 7 हजार शेतकरी असे आहे की त्यांना विमा मिळाला नाही.आमचे विमा कंपन्याशी बोलणे चालू असून लवकरच तो प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन त्यांनी शेतकऱ्याला दीले.

असून सर्व शेतकऱ्यांनी या वर्षी 1 रुपयात पीक विमा या शासकीय योजनेचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा असे सांगितले व ई पीक पाहणीचे सर्व शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखविले यावेळी गावातील शेतकरीश्रीधर काळे,यादवराव पांडे,मोहन अवताडे ,काशिनाथ खडसे,मनोज वादाफळे,उपेंद्र गायकवाड,अशोक गायकवाड,आकाश गायकवाड,लीलाधर काळे,व मारेगाव येथील तहसीलदार, तलाठी,कोतवाल,अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here