म्हैसदोडका येथील घटना.
विदर्भ एस.पि.न्युज नेटवर्क मारेगांव,
मारेगांव तालुक्यातील म्हैसदोडका येथील तलाठी कार्यालया जवळील रोहित्रा (डीपी) जवळ अचानक जागेला विद्युत प्रवाह असल्याने सकाळी एकाच शेतकऱ्यांचे सुमारे 10 बैले नाल्या कडे पाणी पिण्यासाठी जात असतांना जीवंत कृषि पंप लाईनच्या डीपी जवळ विजेच्या धक्याने एक बैल जागीच ठार झाला तर काही बैल सुदैवाने वाचाले ही घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज दिनांक 19 जुलै 2023 रोज बुधवारला सकाळी 7 वाजताच्या सुमारास घडली.
मारेगांव तालुक्यातील म्हैसदोडका येथे गावाला लागूनच तलाठी कार्यालया समोर डीपी आहे व बाजुलाच जिवंत नाला आहे.येथील अनेक शेतकऱ्यांना आपल्या बैलांना पाणी पिण्यासाठी येथे नेत असतात पण काल रात्री पासून परिसरात पाऊसाने हजेरी लावली होती.

नेहमी प्रमाणे मारोती भिवाजी घागी यांचे 10 बैल सकाळी 7 वाजताच्या सुमारास घरा जवळील नाल्यावर पाणी पिण्यासाठी नाल्यावर जात असताना तलाठी कार्यालया जवळ आलेल्या डीपीच्या जवळील परीसरात अचानक विद्युत प्रवाह सुरू होता त्या मुळे काही बैलांना विद्युत प्रवाहचा धक्का बसला तर एक बैलचा जागीच मृत्यू झाला आहे.
सदर ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू असल्याची कोणालाही माहिती नव्हती.घागी यांच्या बैलाला विद्युत डीपी जवळील पोल जवळ जोरदार झटका बसला यात एक बैल जागीच ठार झाला आहे.येन शेतीचा हंगामात बैलांच्या अशा मृत्यूने शेतकऱ्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले असून शेती कशी करावयाची.हा यक्ष प्रश्न उभा ठाकला आहे.सदर शेतकऱ्याला आर्थिक मदत मिळावी अशी पिडित शेतकऱ्याची मागणी आहे.