१९ मार्च २०१९ मध्ये सकाळी सत्तपल्ली गावाजवळ घडला होता अपघात.
तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]
झरी जामणी अपघाताने मृत्युस कारणीभुत झालेल्या आरोपी नामे सुधाकर मारोती ढोरबावणे रा.पाटणबोरी ता.केळापुर जि.यवतमाळ यास एक महीना साधा कारावास व हजार रुपये दंडाची शिक्षा प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी श्री बी.एस.वाढई यांनी दि.२६/०७/२०२३ रोजी सुनावली आहे.
सविस्तर वृत्त असे कि,दि.१९.०३.२०१९ रोजी सकाळी ६.०० वाजताचे सुमारास झरीजामणी तालुक्यातील सतपल्ली गावातील ईसम नामे नारायण राजाराम लक्षट्टीवार हे संडासला पायदळ जात असताना बोरीकडुन पाटणला जात असलेला मोटारसायकल क्र.एम.एच.२९ बीपी २०९१ च्या चालकाने आपले ताब्यातील मोटारसायकल ने भरधाव व निष्काळजीपणे चालवीत धडक मारल्याने रोडवर पडुन मार लागला
अँटोने उपचारासाठी बोरी येथील दवाखान्यात नेले असता उपचारादरम्यान मरण पावल्याचे डॉक्टरांनी सांगीतले वरुन मृतकाचे पुतन्याने पोलीस स्टेशन पाटण येथे जावुन रिपोर्ट दिला वरुन पोलिसांनी मोटारसायकल चालक आरोपी विरुद्ध भादवि चे कलम ३०४(अ) अंतर्गत गुन्हा नोंद केला व सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक गणेश मोरे यांनी करुन प्रकरण न्यायप्रविष्ट केले.
प्रकरणात सरकारी पक्षाचे वतीने फिर्यादी व डॉक्टर यांचेसह आठ साक्षदारांचे बयाण ग्राह्य धरुन न्यायालयाने आरोपीस वरील प्रमाणे शिक्षा सुनावली आहे. यात सरकारी पक्षाचे वतीने सहाय्यक सरकारी वकील पी.डी.कपुर, ठाणेदार संदीप पाटील यांचे मार्गदर्शनाखाली कोर्ट पैरवी ए एस आय मारोती टोंगे व नापोका संतोष मडावी यांनी काम पाहिले.


