झरीत खड्याची पुजा व नारळ फोडून केला रोष व्यक्त.

0
122

– अंतर्गत रस्त्यांकडे झरी नगर पंचायत चे दुर्लक्ष.
– तात्काळ खड्डे दुरुस्ती मुख्याधिकारी यांना निवेदन.

तालुका प्रतिनीधी :-झरी (जामनी) ज्ञानेश्वर आवारी
[88059 79173]

झरी येथे हनुमान मंदीर ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत रस्यावर खड्डे पडले आहेत असून पावसाळ्यात पाणी साचून चिखल झाले आहे .ह्या रस्त्यावरील खड्डे बुजवून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी मुख्याधिकारी यांचे कडे निवेदन दिले आहे.

झरी नगर पंचायत क्षेत्रातील हनुमान मंदिर ते ग्रामीण रुग्णालय पर्यंत च्या रस्त्यावर खड्डे पडले आहेत.याच रस्त्याने शाळा,आय टी आय ,न्यायालय ग्रामीण रुग्णालय,तालुका कृषी अधिकारी कार्यालय आहे.या कार्यालयात जाणाऱ्यांना,रुग्णांना तसेच विद्यार्थ्यांना या खड्डयात पाणी साचून झालेल्या चिखलाचा त्रास होत आहे.दुचाकी चार -चाकी वाहन चालविणे कठीण होत आहे.

या मार्गाने नगराध्यक्ष,बांधकाम समितीचे सभापती,नगरसेवक जातात त्यांना हे दिसत नाही का ? असा प्रश्न त्यानी विचारला आहे.रस्त्याच्या मधोमध पाणी साचून झालेल्या डबक्याचा पुजा व नारळ फोडून रोष व्यक्त करत नागेश सोयाम,राजू शेख माधवराव आत्राम,किशोर उइके,प्रमोद भांडेकर,अयुब कोकाटे इ.कडून मुख्याधिकारी नगर पंचायत झरी जामणी यांना निवेदन देण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here