सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

0
79

जगाचा पोशिंदा शेतकरी त्याला साथ बैलाची दोघांच्या कष्टातून हिरवी पिके फुलती..!

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,

पोळा हा सण बैलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याचा ऐतिहासिक दिवस मानला जाणारा सण म्हणजे पोळा.महाराष्ट्रात पोळा हा सण.शेतकरी पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात सर्वत्र साजरा करतात.

भारतीय शेतकऱ्याला शेतीच्या कामात बैलांचा खूप उपयोग असुन बैल वर्षभर शेतात कष्ट करतो.त्यामुळे आपल्याला अन्न मिळते.बैल आपला पोशिंदा आहे.त्याचा मान राखण्यासाठी पोळा हा सण साजरा केला जातो.या सणाला ‘बैलपोळा’असेही म्हणतात.

यावर्षी पोळा हा सण आज दिनांक 14 सप्टेंबर 2023 गुरूवारला आहे.पोळा हा सण पिठोरी अमावस्या ( श्रावण मासातील अमावस्या) साजरा केला जातो.या दिवशी बैलांच्या कष्टांना सुट्टी असते. त्यांना त्या दिवशी मनसोक्त चरण्यासाठी माळरानावर सोडले जाते.

त्यांची आंघोळ घालून शेतकरी आपल्या बैलांना विविध रंगाने व रंगीबेरंगी झुल घालून,कपाळावर सिंदूर लावून,फुलांच्या माळांनी सजवून झुली,बाशिंग,घुंगूरमाळा,वेसन मोरक्या,कासरे,घंटी सजावटीने त्यांना सजवले जाते व सणाची सुरुवात होते.त्याला ओवाळून त्याची पूजा केली जाते.त्याला वरणापुरणाचे जेवण जेवू घातले जाते.

नंतर त्याची गावातील मंदिरातून मिरवणूकही काढली जाते.हा सण म्हणजे बैलाचा सत्कारच असतो.शेतकरी हा सण मोठ्या कृतज्ञतेने व अत्यंत आनंदाने साजरा करतात. पोळ्याचा दुसरा दिवस म्हणजेच तान्हा पोळा व मारबतीचा दिवस होय.श्रावण महिन्याचा अखेरचा सण म्हणजे पोळा. यानंतर चाहुल लगते ती बाप्पच्या आगमनाची …. गणेशोत्सवाची.

“विदर्भ एस.पि.न्यूजच्या सर्व टीम कडून सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळा सणाच्या हार्दिक शुभेच्छा…!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here