विदर्भ एस पि न्युज नेटवर्क:- मारेगांव,
मारेगाव तालुक्यातील आकापुर व सराटी येथे आज दिनांक 15 सप्टेंबर 2023 रोज शुक्रवारला दोन्ही गावामध्ये ताना पोळा हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आकापुर गावातील माजी पोलिस अधिकारी बंडू जी देऊळकर यांच्या नेतृत्वात आणि गावातील युवा मंडळीनी यांनी आयोजन केले.या तान्या पोळ्यांमध्ये गावातील लहान मुलांनी सहभाग घेवून नंदी बैलाला छान सजवून गावातील मंदिराजवळ आणले सर्वांच्या नंदीचे पूजन करून सर्वाना खाऊचे वाटप करण्यात आले.

यासाठी गावातील ग्रा.प.सदस्य. हरीश परचाके,संतोष सालवटकर,नितीन खंडाळकर,मनोज वाढई,आशिष देऊळकर,गणेश बावणे,अनिकेत सोनेकर,निखिल बोढे, आशुतोष देऊळकर,नयन वाढई,आशिष गाताडे,नागेश गाताडे,अतुल चटकी यांनी कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतले.
तर सराटी या गावा मध्ये ताना पोळ्याचे आयोजन जाणता राजा युवा मंडळ सराटी यांचे तर्फे करण्यात आले असुन गावातील ग्राम पंचायत कार्यालयाच्या रस्त्यांनी ताना पोळा भरविण्यात आला होता.यामधे गावातील असंख्य नागरिकांनसह लहान मुलांचा सहभाग होता.

या ताण्या पोळ्याचे पाहिले पारितोषिक गंधर्व राजू काकडे तर दुसरे पारितोषिक शौर्य विजय आत्राम आणि तृतीय पारितोषिक दक्ष श्रीकांत बोधे याला देण्यात आले.असुन या तान्या पोळ्याला पर्यवेक्षक मनुन लाभलेले मुख्यद्यापक दर्बेशर सर व देवगडकर सर यांची उपस्थिती होती.
