विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव- देशभरात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होत आहे. याच वर्षात ‘ मेरी मीट्टी मेरा देश’ अभियानांतर्गत तालुक्यातील बुरांडा (ख) येथे ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन ग्रामपंचायत बुरांडा(ख) द्वारेे आज दि. 26 सप्टेंबर 2023 रोज मंगळवारला दुपारी 11.30 वाजताच्या करण्यात आलेे होते.
यानिमित्त्य निघालेल्या मिरवणूकीत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभरात विविध उपक्रम साजरे केले जात आहे.याच उपक्रमांतर्गत दि. 26 सप्टेंबर रोजी मारेगाव तालुक्यातील बुरांडा (ख) येथेही ग्रामपंचायतद्वारे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘ मेरी मीट्टी मेरा देश ‘ अभियाना अंतर्गत ‘अमृत कलश दिंडीचे’ आयोजन करण्यात आले होते.

यावेळी स्थानिक शेकडो नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.यावेळी जिल्हा परिषद शाळा बुरांडा (खडकी) येथील मुख्यध्यापक दैने सर,डोहने सर,विद्यार्थ्यांनी ‘अमृत कलश दिंडीत’ सहभाग नोंदविला.या’अमृत कलश दिंडीत ‘ बुरांडा (ख) येथील ग्रामसेवक कु.काकडे मॅडम,पोलीस पाटील बबन जोगी,सेवक भारत आत्राम, दयाल गुंजेकर,ग्रामपंचायत सदस्य,गावातील आशा व अंगणवडी सेविका तसेच स्थानिक ग्रामस्थांनी उस्फूर्त सहभाग नोंदवला.


