तालुका स्तरीय आंतर शालेय मैदानी क्रीडा स्पर्धेत कला वाणिज्य विज्ञान क.महाविद्यालय मारेगाव च्या विध्यार्थ्यांचे दैदिप्यामान यश.

0
116

विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव

आज दिनांक 27 सप्टेंबर 2023 रोज बुधवारला पंचशील विद्यालय नवरगाव येथे पार पडलेल्या तालुका स्तरीय आंतर शालेय क्रीडा स्पर्धेत 19 वर्षाखालील खेळामध्ये मध्ये कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय मारेगाव च्या विद्यार्थ्यांनी अतुलनीय कामगिरी केली आहे.

वैयक्तिक क्रीडा प्रकारात भाला फेक,गोळा फेक,उंच उडी,लांब उडी,1500 मीटर धावणे या क्रीडा प्रकारात महाविद्यालयातील मुल व मुली सहभागी होऊन तालुका स्तरीय स्पर्धेमध्ये यश संपादन केले असून त्यांची निवड जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी झाली आहे.तसेच सांघिक या क्रिडा प्रकारात व्हॉलीबॉल,व कब्बडी स्पर्ध मध्ये मुले जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी पात्र झाले आहे.

विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल त्यांचे विविध स्तरावरून कौतुक करण्यात येत आहे.खास म्हणजे हे सर्व विध्यार्थी ग्रामीण भागातून येतात म्हणून त्याचे विशेष करून कौतुक केले जात आहे.मारेगाव तालुका हा इतर तालुक्याच्या तुलनेत काही प्रमाणात मागासलेला समजला जातो परंतु असे असून सुद्धा कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात विध्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्याचं काम सर्व प्राध्यापकाकडून वेळोवेळी केल जात आहे.

महाविद्यालयांचे असलेलं भव्य क्रिडा मैदान विध्यार्थ्यांचा खेळाप्रती उत्साह द्विगुणित करते.या सर्व विध्यार्थांकडून नियमित पणे क्रीडा शिक्षकाने करून घेतलेला सराव तसेच विध्यार्थांची खेळप्रती असलेली तळमळ,आत्मीयता या सर्व बाबींमुळे विध्यार्थांनी यश संपादन केलेले दिसून येत आहे.त्यामुळे त्यांच्या कठीण मेहनतीचे त्याला फळ मिळालेलं आज झालेल्या स्पर्धेत त्यांने प्राप्त केलेल्या यशातून निदर्शनास येते.

विध्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर तसेच प्रा.चिंचोलकर सर प्रा.हेलगे सर तसेच सर्व प्राध्यापकाना व त्यांच्या आई वडिलांना दिले आहे.विध्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबदल संस्थेचे अध्यक्ष जिवन पाटील कापसे व प्राचार्य हेमंत चौधरी सर यांनी त्यांचे चे अभिनंदन केले व पुढील जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here