शेतातील पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्या.
कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाची तहसीलदारा मार्फत मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव तालुक्यात या वर्षी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी कापूस व सोयाबीन पिकाची लागवड या वर्षीचा हंगामात केली असुन आधीच अतिवृष्टीने, व पूर बुडाई झाल्याने शेतकरी हा मेटीकुटीस आला असताना आता सोयाबीनवरील येलो मोझॅक किडरोगाने फटका दिला आहे.तालुक्यात दोन हजार दहा हेक्टरातील सोयाबीन पीक सध्या या रोगाच्या चक्रव्यूहाच्या जाळ्यात अडकले आहे.
येलो मोझॅक विषाणूजन्य रोग असून तो सोयाबीन पिकाची वाढ,फुलोरा,आणि शेंगधरणीच्या काळात पिकावर हल्ला करतो.सध्या अनेक शेतकऱ्यांच्या पिकांवर या रोगाने आक्रमन केल्याने शेतकरी हवादिल झाला असुन मोठ्या प्रमाणात पिकाचे नुकसान झाले आहे.त्या मुळे तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत द्यावी.असे निवेदन मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळाने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री तथा जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.

आधीच शेतकरी अवकाळी आणि अतिवृष्टी अशा दुहेरी संकटात सापडला आहे. व मेटीकुटीस आला आहे.यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा यांचेसह मारोती गौरकार, कृ.उ.बा.स.संचालक काशिनाथ खडसे,रमन डोये,प्रफुल विखनकर,संतोष मडावी,यादव काळे,भास्कर धांदे,अविनाश लांबट,जीवन काळे,विजय अवताडे,महादेव सारवे,विलास वासाडे,तुळशीराम कुमरे,डिमनताई टोंगे,गोवर्धन टोंगे,प्रकाश पिदुरकर, रविदास चंदनखेडे,जनार्धन गाडगे यांचेसह अनेक शेतकरी उपस्थित होते.


