विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील नरसाळा येथे स्वछता पंधरवाडा उपक्रमा अंतर्गत ‘ एक तारीख ,एक तास ‘ श्रमदान श्री संत गजानन महाराज माध्य विद्यालय येथे ‘ स्वच्छता पंधरवडा ‘ हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
आज दिनांक 1ऑक्टोंबर 2023 रोज रविवारला सकाळी 8 ते 9 वाजता श्री संत गजानन महाराज माध्यमिक विद्यालयामध्ये ‘ एक तारीख एक तास ‘ श्रमदान हा उपक्रम राबविण्यात आला असुन शाळा व शाळेसमोरील परिसराची सामूहिक स्वछता करण्यात आली.केंद्र शासनाच्या आदेशाने ‘स्वच्छता पंधरवाडा’ हा उपक्रम अवघ्या देशभरात साजरा करण्यात येत आहे.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक भुदेव पांडे,सहाय्यक शिक्षक गजनान देवाळकर सर,राऊत सर,रवींद्र घूगल,पंकज मत्ते, सुनील रायपुरे,कृष्णा मेश्राम व शाळेतील विद्यार्थी विद्यार्थीनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.



