विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील जि.प.उच्च प्राथमिक शाळा हिवरी येथे
महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून ‘स्वच्छता हि सेवा’ उपक्रम घेण्यात आला.

या उपक्रमांतर्गत शाळा परिसर व गावातील सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.जि.प.शाळा हिवरी येथे महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे प्रतीमेचे पूजन करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांचे जीवनातील प्रसंगावर सुंदर भाषणे दिलीत.

या कार्यक्रम प्रसंगी शा.व्य. स.अध्यक्ष ईश्वर थेरे, ग्रा.प. सदस्य युवराज आस्वले, सौ. सुवर्णा कुळमेथे, सौ.शुभांगी पिंपककर सौ.लता मेश्राम,गणेश सोमलकर,निलेश डवरे,गुणवंत देरकर उपस्थित होते.तसेच विद्यार्थी व पालक गोठ्या संख्येने उपस्थित होते.शाळेचे मुख्याध्यापक स्वप्नील नवखरे सर यांनी या उपक्रमाची माहिती व महत्व उपस्थितांना सांगितली तर कार्यक्रमाचे संचालन अमोल वावरे यांनी केले.


