– वाघाच्या हल्ल्यात गाय ठार
– दोन दिवसा आधी पण केला होता एका गाईवर हल्ला.
विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील बोटोनी येथील जंगलात आज दिनांक 3 ऑक्टोंबर 2023 रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास ही घटना घडली आहे.परिसरात आणखी वाघाने एंट्री केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
कमल कवडू नेहारे नामक या महिलेच्या मालकीचे पशुधन वाघाच्या हल्लात ठार झाले आहे.पशुधन मालकाने त्वरीत वन विभागाला घटनेच्या संदर्भात माहिती दिली.वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येवुन पंचनामा सुरू केला आहे. दिवसेंदिवस वाघाची दहशत परिसरात वाढत असल्याने नागरिकात चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे.
वाघाच्या हल्ल्यात पशुधन मालकांचे मोठे नुकसान झाल्याचे पशुधन मालकाने सांगितले वनविभागाकडून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी पशुधनाच्या मालका कडून होत आहे.
तर दोन दिवसा आधी बोटोनी येथील जंगलात वाघाने गाईवर हल्ला केला होता यामध्ये गाय गंभीर जखमी झाली होती ही घटना दिनांक 1 ऑक्टोंबर 2023 रोज रविवारला घडली होती परीसरात हिंस्त्र प्राण्याचा मुक्त संचार नेहमी असतो.अधून-मधून वाघोबाचे दर्शन परिसरातील जनतेला होत असते.गावातील पशुधनाला चराई साठी गावाशेजारील जंगलात न्यावे लागते.

नित्यनेमाप्रमाणे ता 1ऑक्टोबर च्या दिवशी गुराखी अरुण नागोसे गुरांना चारण्यासाठी जंगलात नेले असता वाघोबा घनदाट जंगलाच्या आडोशात दडी मारून दबा धरून बसलेल्या वाघोबाने रामलू टेकाम या पशुमालकांच्या छोट्या वासराच्या गायीवर वाघाने हल्ला करून गायीच्या मागील भागास जखमी केले. वाघाने गायीला खाली पाडण्याचा पुरेपूर प्रयत्न केला परंतु गायीचे दैव बलवत्तर म्हणून जीवित हानी झाली नसली तरी वाघाच्या हल्ल्यातील जनावरे दगावन्याची दाट शक्यता असते.
हे नाकारता येत नाही.वाघाने गायीवर हल्ला करताना गुराख्याने पाहिलेले चित्र पाहून अंगाला शहारा आल्याचे गुराख्याने बोलून दाखविले दिवसेंदिवस जनावरांवर होणारा हल्ला पाहून गुराख्यात धास्ती निर्माण झाल्याचे परिसरात सर्वत्र दिसत आहे.तसेच परिसरसतील शेतकरी देखील रानटी जनावरांचा मुक्त संचार शेतकऱ्यांच्या शेतात होत असल्यामुळे वनविभागा प्रति नाराज असल्याची परिसरात जोरदार चर्चा ऐकू येत आहे.पशुधन मालकांच्या असो किंवा शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी काढा अशा मागन्या परिसरात होत आहे.
प्रतिक्रिया…..
बोटोनी परीसरात वाघाचे अस्तित्व आहे.त्या मुळे जंगलात विनाकारण कोणीही जाऊ नये व जंगलात जनावरे नेत असताना गाई गुरांना घंटी बांधावी व जंगला जवळील शेतकऱ्यानी शेतात जाताना आवाज करत जावे.रात्री जास्त वेळ शेतात थांबू नये सावधगीरी बाळगावी असे आवाहन शंकर ग.हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांच्या तर्फे करण्यात आले आहे.


