मारेगाव जवळ आढळला अजगर

0
162

बघ्यांची उसळली गर्दी

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव शहरा पासुन अवघ्या 1.5 कि.मी अंतरावर करनवाडी ते मारेगाव राज्य महामार्गाच्या कडेला आज दिनांक 1 जानेवारी 2024 रोज सोमवारला दुपारी 12:30 वाजताच्या सुमारास एक खूप मोठा अजगर आढळुन आला.

अजगर दिसताच त्याला पाहण्यासाठी बघ्याची मोठी गर्दी झाली होती.काही नागरिकांनी फॉरेस्ट ऑफिसला माहिती दिली.माहिती मिळतात फॉरेस्टची टीम त्या ठिकाणी दाखल झाली.राज्य महामार्गावर गर्दी होत असल्याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार जनार्धन खंडेराव यांना मिळताच ते पोलिस कर्माच्याऱ्यासह अजगर असलेल्या ठिकाणी दाखल झाले.

फॉरेस्ट ऑफिसर शंकर हटकर वनपरिक्षेत्र अधिकारी मारेगाव यांनी सर्प मित्र हरीभाऊ कापसे व मारेगाव येथील त्यांच्या टीमला पाचरण करून 1 वाजताच्या सुमारास अजगराला रेस्क्यू करण्यात येऊन सुरक्षित स्थळी जंगलात सोडण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here