विदर्भ एस पि न्युज नेटवर्क: मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील हिवरी येथील मनोहरराव तुकाराम आस्वले यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 63 वर्षाचे होते.
मनोहरराव तुकाराम आस्वले हे महाराष्ट्र राज्य सहकारी बँक नागपूर विभाग,विभागीय कार्यालय निरीक्षक पदी निवृत्त अधिकारी होते.ह.मु.चिंतामणी नगरी 1 मानेवाडा नागपूर येथे राहत होते. आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोज शनीवारला पहाटे 3 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली..
त्यांचे पश्चात पत्नी,एक मुलगा, एक मुलगी असा आप्त परिवार आहे.त्यांच्या पार्थिवावर आज दिनांक 30 डिसेंबर 2023 रोज शनिवारला नागपूर येथील मानेवाडा रोडवरील मोक्षधाम मध्ये दुपारी 2 वाजताच्या सुमारास अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.