शासनाने केलेल्या काळ्या कायद्याचा केला विरोध
सुरेश पाचभाई मारेगाव,
भारत सरकारचा ‘हिट अँड रण’ हा कायदा अन्यायकारक असल्याचा आरोप करत पुन्हा राज्यातील वाहन चालकांनी ठिकठिकाणी आंदोलन सुरु केले. या आंदोलनाचे तीव्र पडसाद मारेगावातही उमटले असून आज दिनांक ११ जाने. ला यवतमाळ-वणी राज्य महामार्गावरील करणवाडी फाट्यावर दुपारी १२ वाजता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
शहरी व ग्रामीण भागातील सर्व वाहन चालक संघटित होऊन वाहन चालकांच्या मानगुटीवर बसणारा वटहुकूम, काळा कायदा रद्द करण्यासाठी तहसीलदार यांचे मार्फत देशाचे गृहमंत्री (भारत सरकार) यांना निवेदन देण्यात आले. केंद्र सरकार च्या विरोधात व हिट अँड रण हा कायदा रद्द करण्याकरिता लाल बावटा वाहन चालक युनियन शाखा नरसाळा, ऑटो युनियन मारेगाव, जय जगन्नाथ वाहन चालक मालक संघटना मारेगावच्या वतीने करणवाडी फाट्यावर सकाळी ११ वाजता केंद्र सरकारचा विरोध व काळा कायदा रद्द करण्यासाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले यावेळी तालुक्यातील सर्व वाहन चालक व मालक सहभागी झाले .
