-राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या जयघोषाणे दुमदूमला गाव
सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव तालुक्यातील गोधणी येथे अखिल विश्वाला सर्वधर्म समभावाची शिकवण देणाऱ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
विश्वव्यापी गुरुदेव सेवा मंडळ यांच्या पुढाकाराने साजरा करण्यात आलेल्या जन्मोत्सव कार्यक्रमात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या तैलचित्राची मिरवणूक गावातील प्रमुख रस्त्याने भजन कीर्तन व जयघोषाणे अख्ख गाव दुमदूमले होते.

जन्मोत्सवासाठी प्रत्येक घरी रंगीबेरंगी रांगोळी ने अंगण सजावट करण्यात आले होते.विशिष्ट अंतरावर थोर पुरुष व संताचे छायाचित्र ठेवून मानवतेच्या ऐकतेचा संदेश देण्यात आला.यावेळी गावातील शेकडो महिला पुरुष आबाल वृद्ध, बालक विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळ व ग्रामवासी यांचेकडून भजन मंडळातील स्व.मारोती मडावी,स्व.नामदेव पावडे, स्व. रामदास गौरकार यांना आदरांजली वाहण्यात आली.भजन व कीर्तनाने कार्यक्रमाची सुरुवात होवून यावेळी देवभोळेपणा, जुनाट कालबाह्य अंधश्रद्धा नाहीशा व्हाव्यात व सर्वधर्मसमभाव हेही राष्ट्रसंताच्या विचारविश्वाचे प्रबोधनाने सोहळ्याची सांगता करण्यात आली.