तहसीलदारांनी केली अवैध रेती तस्करावर कारवाई

0
93

कोसारा येथे दोन अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगाव तालुक्यातील कोसारा येथे आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोज बुधवारला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास सोईट ते कोसरा रोडवरील कोसारा गाव जवळ अवैध उत्खनन करून वाहतूक करीत असलेल्या दोन ट्रॅक्टरवर मारेगाव महसूल विभागाने कारवाई केली त्यामुळे रेती तस्करांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

मारेगाव तालुक्याला समृद्ध असा वर्धा नदीचा किनारा लाभला आहे. त्यामुळे या वर्धा नदीच्या मार्गाने मोठया प्रमाणावर रेतीची तस्करी होत असते.आजपर्यँत अनेक रेती तस्करांवर कारवाई सुद्धा झाली.परंतु रेतीची अवैध वाहतूक मात्र बंद झालेली नाही.

अशातच आज सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास कोसारा येथे दोन ट्रॅक्टरवर कारवाई करण्यात आली असून रेती तस्कर ट्रॅक्टर व हायवा वाहनाने हे गोरखधंदे करीत असल्याने सातत्याने महसूल विभाग त्यांच्या कायम मागावर होते.आज सायंकाळी तहसीलदार उत्तम निलावाड,नायब तहसीलदार गिरीश बोर्डे, गुगाणे मंडळ अधिकारी मार्डी,तलाठी विवेक सोयम,एस.कुडमेथे विकास मडावी,शिंगणे वाहन चालक विजय कणाके, शिपाई अमित कोयचाडे,राजू गायकवाड यांनी ही कारवाई केली.

आज महसूल पथक रेती तस्करांच्या मागावर असतांना रेती भरलेल्या दोन ट्रॅक्टरवर हे अवैध वाहन सोईट कडून कोसार गावाकडे येत असताना गावा जवळ पकडण्यात आले. पंचनामा करून दंडात्मक कारवाई साठी ताब्यात घेतलेला ट्रॅक्टर तहसील कार्यालयात येथे जमा करण्यात आल्याची माहिती आहे.

परिणामी, रेती तस्करांच्या दिवसागणिक मुजोऱ्या वाढून प्रशासनाला तुरी देण्याचे षडयंत्र नित्याचेच झाले असून सातत्याने महसूल विभाग ऍक्शन मोडवर येत रेती तस्करांचे मनसूबे हाणूण पाडण्यासाठी पारदर्शक अधिकारी तहसीलदार,मंडल अधिकारी,तलाठी,कोतवाल सातत्याने प्रयत्नशील आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here