आगामी छ्त्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त
जयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे सदस्य यांची मीटिंग घेण्यात आली.
सुरेश पाचभाई मारेगांव,
मारेगाव पोलीस स्टेशन येथे काल दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोज शुक्रवारला सायंकाळी 7:30 वाजता वाजताच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार मारेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांचे प्रमूख उपस्थितीत तालुक्यातील व परिसरातील आगामी शिवजयंती उत्सव मंडळाचे पदाधिकारी व शांतता समितीचे पदाधिकारी,जेष्ठ नागरिक,व्यापारी,यांची सभा घेण्यात आली.
सभेमध्ये शासनाने पारित केलेल्या निर्देशाची तंतोतंत पालन करणे करिता आदेशित करून शिवजयंती उत्सव शांततेत पार पडणे करीता व तसेच घ्यावयाच्या दक्षतेबाबत मार्गदर्शन केले असुन मारेगाव येथील पोलीस स्टेशन प्रांगणात शांतता समितीची बैठक घेऊन काही मार्गदर्शक सूचना केल्या.
शिवजंतीच्या पार्शभुमिवर शांतता व सुव्यवस्था राखणे गरजेचे असून मारेगाव तालुक्यामध्ये कुठलाही प्रकारचा अनुचित प्रकार घडु नये यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव यांनी शांतता व सुव्यवस्था समितीच्या सभेत तालुक्यातील जेष्ठ नागरिक,पत्रकार बंधू व गावातील प्रतीष्ठीत नागरिक या सर्वाना ठाणेदार यांनी यावेळी मार्गदर्शन केले.