सुरेश पाचभाई मारेगाव,
मारेगाव येथील कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय येथे दि.१५ फेब्रुवारी २०२४ रोज गुरुवारला वर्ग १२ वी कला वाणिज्य व विज्ञान शाखेमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात आला.
या निरोप समारंभ कार्यक्रमाचे अध्यक्ष कला,वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महा- विद्यालयाचे प्राचार्य – मा.श्री चौधरी सर होते.तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून प्राध्यापक कु.आवारी मॅडम,प्रा.कुरेकर सर,प्रा.कू मस्की मॅडम, प्रा.कु.सातपुते मॅडम होत्या तर प्रमुख उपस्थिती प्रा. कु.बेतवार मॅडम, प्रा.हेलगे सर,प्रा.कु.विश्वंभरे मॅडम,प्रा.चिंचोलकर सर प्रा.चोपणे सर प्रा. कु.कुचनकर मॅडम,प्रा.कु.धानोरकर मॅडम, प्रा. कु.नयना आवारी मॅडम,प्रा.मडावी सर उपस्थित होते.

अध्यक्षीय भाषणातून महाविद्यालयाचे प्राचार्य हेमंत चौधरी सर यांनी परीक्षा संदर्भात भीती न बाळगता परीक्षा शांत स्वरूपाने देऊन जीवनात यशस्वी व्हा,अधिकारी व्हा असा आशावाद व्यक्त केला.
प्रा. कु.आवारी मॅडम यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रास्ताविकातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जीवनात कुठेही काम करत असताना ते निष्ठेने केले पाहिजे.स्वतःच्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करा आणि आपलं चांगलं भविष्य घडवा असा मौलिक संदेश दिला.
कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक कुरेकर सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपण समाजाचं काही देणं लागते हे लक्षात ठेवून वागलं पाहिजेत.तसेच विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना आपली क्षमता ओळखून आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करावं असा मूलमंत्र दिला तसेच परीक्षेसंदर्भात माहिती दिली.प्रा. मस्की मॅडम, प्रा.सातपुते मॅडम, प्रा.हेलगे सर,प्रा.चोपणे सर, प्रा.चिंचोलकर सर, प्रा. कु.कुचनकर मॅडम, प्रा.कु.धानोरकर मॅडम, प्रा. मडावी सर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व येणाऱ्या बारावीच्या परीक्षेत संदर्भात माहिती दिली व परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले व आपल्या महाविद्यालयीन जीवनातील या दोन वर्षातील अनुभवांचे कथन केले शिक्षका प्रती आदर व्यक्त केला.कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय मारेगाव राज्यस्तरीय भालाफेक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल कु.वर्षा विनोद आत्राम वर्ग १२ वा (कला) हिला सन्मान चिन्ह देण्यात आले. व राज्यस्तरीय गोळा फेक स्पर्धेत निवड झाल्याबद्दल फाजील आदिल जुमनाके वर्ग १२ वा कला याला सन्मानचिन्ह देण्यात आले.
या निरोप समारंभ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.कु.बेतवार मॅडम यांनी केले प्रास्ताविक प्रा.कु.आवारी मॅडम यांनी केले तसेच पाहुण्याचे आभार प्रा.कु. विश्वंभरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राध्यापक चिंचोलकर सर, निलेश बेंडे व विकास ढोके व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वी रीत्या पार पाडला.