बुरांडा (ख) येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी

0
83

ढोल ताशांच्या गजरात काढली गावातुन भव्य मिरवणूक

शिवजन्मोत्सव ‘नवयुवक मंडळ व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख) यांचे संयुक्त विद्यमाने शिवजयंती साजरी

सुरेश पाचभाई मारेगाव,

मारेगांव:-तालुक्यातील बुरांडा(ख)येथे काल दिनांक १९ फेब्रुवारी २०२४ रोज सोमवारला छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी करण्यात आली.

सायंकाळी ७ वाजता सुमरास गावातील मेन चौकात शिवजन्मोत्सव निमित्त श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फलकाचे अनावरन माजी सैनिक नामदेवजी कनाके यांचे हस्ते करण्यात आले.त्या नंतर पाहुण्यांच्या सत्कार समारंभाचा कार्यक्रम संपन्न झाला व सायंकाळी ७:३० वाजता ढोल ताशांच्या गजरात गावात भव्य शिवजन्मोत्सव मिरवणूक काढण्यात आली.

शिवजन्मोत्सव नवयुवक मंडळ,व नवयुवक बौद्ध मंडळ, बुरांडा (ख.) यांचे संयुक्त विद्यमाने ही मिरवणूक काढण्यात आली.यावेळी गावातील सरपंच,उपसरपंच यांचे सह ग्रामपंचायत सदस्य तथा ज्येष्ठ नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here