शिवजयंतीच्या पर्वावर मान्यवरांचा सत्कार

0
164

विदर्भ एस.पी.न्यूज पोर्टलच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त आयोजन

सुरेश पाचभाई मारेगाव

मारेगाव तालुक्यातील विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या वीरांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन आज विदर्भ एस.पी. न्यूज मारेगाव यांचे वतीने करण्यात आले होते.

शिवजयंतीच्या पर्वावर आणि विदर्भ एस.पी.न्यूजच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान आदर्श हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक भास्करराव धानफुले,उदघाटक मारेगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष डॉ.मनिष मस्की,आयोजक इंजिनीयर सुरेश पाचभाई,प्रमुख अतिथी म्हणून नायब तहसीलदार ओसीन मडकाम मॅडम,गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव, महावितरणचे उपविभागीय अभियंता शैलेंद्र पाटील,वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर,ज्येष्ठ पत्रकार मोरेश्वर ठाकरे, अनंतराव गोवर्धन, विश्वविक्रमी मनस्वी पिंपरे उपस्थित होते.

यावेळी तहसीलदार उत्तम निलावाड यांच्यातर्फे नायब तहसीलदार ओसीन मडकाम मॅडम यांनी सत्कार स्वीकारला. गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे, पोलीस निरीक्षक जनार्धन खंडेराव,वनपरीक्षेत्र अधिकारी शंकर हटकर,उपकार्यकारी अभियंता महावितरण शैलेंद्र पाटील या मंचावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

तसेच स्केटिंगमध्ये विश्वविक्रम करून भारताचा मान उंचावणाऱ्या मनस्वी पिंपरे, रेती तस्करांच्या मुसक्या आवळणारे अमोल गुघाने त्यांना सहकार्य करणारे तलाठी संदेवल कुळमेथे,विवेक सोयाम,पोलीस प्रशासनाचे राजू टेकाम,रजनीकांत पाटील,अजय वाभीटकर,आनंद अचलेवार, पं. स. कार्यालयातील ग्रामीण गृहनिर्माण अभियंता शुभम काळे,

ग्रामसेवक भाग्यश्री चव्हाण, आर. डब्ल्यू. जनबंधू, ज्ञानेश्वर जाधव,लिपिक प्रमोद देठे,सौ.विद्या मत्ते, डेटा एन्ट्री ऑपरेटर कु.प्रतीक्षा गाडगे,वनविभागाचे बोटोनी क्षेत्रसाहाय्य्क अमोल कुळमेथे,वनरक्षक ज्योती नैताम,वरिष्ठ तंत्रज्ञ आशिष बदखल,चंपत टेकाम,

बँकेमध्ये गरिबांची सेवा करणारे अशोक परेकर यांचा त्यांनी केलेल्या कार्याबद्दल शाल,श्रीफळ आणि सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी मंचवरील सर्वांनी मार्गदर्शन केले.


तसेच कार्यक्रमाबद्दल आपले विचार व्यक्त केले.कार्यक्रमाचे संचालन भास्कर राऊत,प्रास्ताविक सुरेश पाचभाई, आभार गजानन देवाळकर यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी विदर्भ एस.पी.पोर्टल न्यूज चॅनलचे प्रमुख इंजिनीयर सुरेश पाचभाई, गजानन देवाळकर सर,गजानन आसूटकर, ज्ञानेश्वर आवारी,दशरथ  चिकणकर, शंतनु पाचभाई, रोशन गुंजेकार,यांनी सहकार्य केले.

कार्यक्रमाला सत्कारमूर्ती तसेच तसेच मोठया प्रमाणावर मान्यवरांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here