पेट्रोल पंपावर पडलेली रक्कम केली ठाणेदाराच्या स्वाधीन
इमानदारीचे सर्वत्र कौतुक
सुरेश पाचभाई मारेगाव,
पेट्रोल पंपावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या इमानदारीचे दर्शन आज घडून आले. सकाळी पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या एका शेतकऱ्याचे पैसे पेट्रोल पंपावर पडले. पडलेली ही रक्कम पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना दिसताच त्यांनी ती रक्कम पोलीस स्टेशनमध्ये ठाणेदारांना परत देऊन आपल्या इमानदारीचे दर्शन घडविले. कर्मचाऱ्यांच्या या कृतिमुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
मारेगाव येथील मार्डी चौक येथे गेल्या काही महिण्याअगोदर पोलीस वेल्फेअर पेट्रोल पंप सुरु झाले. या पंपावर सतत 24 तास पेट्रोल व डिझेलची सुविधा उपलब्ध असून येथे पेट्रोल व डिझेल भरण्यासाठी वाहणांची वर्दळ असते. हा पेट्रोल पंप पोलीस स्टेशन मारेगाव यांच्या अंतर्गत येतात.या पेट्रोल पंपावर काल दिनांक 8 मार्च 2024 रोज शुक्रवार सकाळी अंदाजे 8 वाजताच्या सुमारास कोलगाव येथील प्रकाश रघुनाथ सुर वय 44 वर्ष हे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरण्यासाठी आले होते.त्यानी गाडीमध्ये पेट्रोल टाकले.
पैसे देतांना गडबडीमध्ये त्यांच्या खिशातून अकरा हजार पाचशे रुपये खाली पडले.पेट्रोल पंपावरील कर्मचारी राजेन्द्र पोटे,पंकज शेंडे, परवेज पंधरे, यांच्या पैसे पडल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी सदर गोष्ट पंपावरील पोलीस अंमलदार रामकृष्ण वेटे,विठ्ठल बुरुजवाडे, सुलभ उईके, मोहन कुडमेथे यांना सांगीतली.त्यांनी लगेचच सदर गोष्ट ठाणेदार शंकर पांचाळ यांना सांगितली.
माहिती मिळताच त्यांनी लगेच त्या व्यक्तीशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला व ज्या व्यक्तीचे पैसे पेट्रोल पंप येथे पडले होते त्याला मारेगाव पोलीस स्टेशन येथे बोलवून पैसे परत करण्यात आले.यामुळे ठाणेदार मारेगाव यांनी पेट्रोल पंपावरील वर्कर व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.अजूनही माणुसकी जिवंत असल्याचे दर्शन मारेगाव शहरात घडले आहे.


