उत्कृष्ट काम करणाऱ्या कॅडरचा सत्कार
सुरेश पाचभाई मारेगाव
8 मार्च या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मारेगाव येथील पंचायत समिती सभागृह मध्ये तालुक्यातील सर्व कॅडर उपस्थित राहून जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात सादरा करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रेविचंद डब्ल्यू जनबंधु, ग्रामसेवक उपस्थित होते. यावेळी तालुक्यातील उत्कृष्ट काम करणाऱ्या कॅडर यांना गटविकास अधिकारी भीमराव व्हनखंडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाला उपस्थित तालुका अभियान व्यवस्थापक विठ्ठल आत्राम,प्रफुल शंभळकर व सर्व प्रभाग स्तरीय कॅडर व गावपातळीवरील कॅडर,पशुसखी, कृषीसखी, बकसखी,icrp,ctc मोठ्या संख्येने उपस्थित होते.


