राज्य महामार्गावरील करणवाडी पेट्रोल पंप जवळील घटना
गजानन आसुटकर मारेगांव,
भरधाव वेगाने जाणाऱ्या चारचाकी वाहनाने समोरून येणाऱ्या दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोन्ही युवक गंभीर जखमी झाले.ही घटना आज दि.19 मार्च 2024 रोज मंगळवारला सायंकाळी 6.30 च्या दरम्यान घडली.
जखमी झालेल्या युवकांचे नाव प्रथमेश कैलास पिदूरकर अंदाजे वय 18 वर्ष व सागर रामलाल लावे अंदाजे वय 20 वर्ष दोघेही रा. ता.मारेगाव असे असून यांचेवर मारेगाव येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार करून त्यांना दुसरीकडे हलविण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की,
मारेगाव येथील दोन युवक त्यांच्या दुचाकीने मारेगाव वरून सायंकाळच्या सुमारास करणवाडीकडे जात होते.त्याचवेळी करंजीकडून MH- 34 BR- 0642 ही कार वणीकडे जात होती.मारेगाव ते करणवाडी दरम्यान असलेल्या पेट्रोल पंपाजवळ या भरधाव कारने दुचाकीला जोरदार धडक दिली.यात दुचाकीवरील दोघेही युवक रस्त्याच्या बाजूला फेकले गेले.दोघांनाही गंभीर इजा झाली.

सदर घटना घडताच या रस्त्याने येजा करणाऱ्या काही नागरिकांनी याची माहिती मारेगाव पोलीस स्टेशनला दिली.माहिती मिळतात मारेगाव पोलीस लगेच घटनास्थळी दाखल झाले. व त्यांनी जखमीना साई मित्र परिवाच्या ॲम्बुलन्सने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयत दाखल केले.पण तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे स्थलांतरित केल्याची माहिती आहे.सदर घटनेचा पुढील तपास मारेगाव पोलीस करत आहे.