डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमी सणाच्या पार्श्ववभूमीवर
– शहरात उत्सव काळात शांतता सुव्यवस्था कायम राहावी
– कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रूट मार्च
सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पि.न्युज नेटवर्क मारेगाव,
मारेगांव आज दिनांक १४ एप्रिल २०२४ रोज रविवारला सकाळी १० ते ११ वाजताच्या सुमारास मारेगांव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमी सणाच्या पार्श्ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी ठाणेदार शंकर पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली मारेगाव शहरातील मुख्य मार्गाने पोलिसांनी रुट मार्च काढला असून

पोलीस स्टेशन मारेगांव शहर हद्दीतील मार्डी चौक,डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक,गौश्या मज्जिद व नगर पंचायत या मुख्य मार्गाने रूट मार्च काढण्यात आले.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व लोकसभा निवडणूक आणि रामनवमीच्या पार्श्ववभूमीवर कायद्या व सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता सदर रूट मार्च करिता पो.स्टे.मारेगांव येथील पो.नि.शंकर पांचाळ ठाणेदार मारेगाव व ०२ पोलिस उपनिरीक्षक आणि १५ पोलीस अंमलदार SRPF जवान प्लॅटून व १४ होमगार्ड रूटमार्च करीता हजर होते.