4500 रुपयाची लाच स्वीकारतांना तलाठी लाचलूचपत विभागाच्या जाळ्यात

0
67

मारेगाव येथील घटना, लाचलुचपत विभागाची कारवाई

सुरेश पाचभाई मारेगाव,

शेतकऱ्याकडून 4500 रुपयाची लाच स्वीकारतांना तलाठ्याला लाचलुचपत विभागाने आपल्या जाळ्यात अडकवले. ही घटना आज दि.16 एप्रिल 2024 रोज मंगळवारला दुपारच्या सुमारास घडली. शालिक मारोती कनाके (56)असे कारवाई करण्यात आलेल्या तलाठ्याचे नाव असून ते मारेगाव तालुक्यातील खैरगांव भेदी आणि अतिरिक्त चिंचमंडळ या साज्याचे तलाठी आहेत.

तालुक्यातील खैरगांव भेदी तसेच चिंचमंडळ येथील अतिरिक्त पदभार असलेले तलाठी शालिक मारोती कनाके यांनी तालुक्यातील चिंचमंडळ येथील शेतकऱ्याला फेरफार तयार करण्यासाठी 5 हजार रुपयाची मागणी केली.तडजोडीअंती ही रक्कम 4500 ठरवण्यात आली.रक्कम ठरली आणि कधी द्यायची तो दिवसही ठरला.

आपल्याच कामासाठी आपल्याला कारण नसतांना पैसे द्यावे लागते ही सल शेतकऱ्याच्या मनात होती. शेतकऱ्याने लाचलुचपत विभागाशी संपर्क साधून त्यांना सविस्तर माहिती दिली.लाचलुचपत विभागाने सापळा रचत दि.16 एप्रिलला मारेगाव शहरातील सुभाष नगर येथील डॉ.जवादे यांचे घरी, साजा क्र.30 येथे कारवाई करीत तलाठी यांना पैसे घेतांना रंगेहात पकडत कारवाई केली.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक अमरावती परीक्षेत्र,अमरावती विभागाचे पोलीस अधीक्षक मारुती जगताप,अप्पर पोलीस अधीक्षक अनिल पवार, पोलीस उपअधीक्षक यवतमाळ उत्तम नामवाडे यांचे मार्गदर्शनात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग यवतमाळचे पोलीस उपनिरीक्षक विनायक कारेगावकर,सापळा व तपास अधिकारी, कारवाई पथक पो.नि.अमित वानखडे, चालक पो.उपनिरीक्षक संजय कांबळे, पोलीस अंमलदार अतुल मत्ते, वसीम शेख, सचिन भोयर, राकेश सावसाकडे, भागवत पाटील, सूरज मेश्राम, सतीश सोनोने यांनी ही कारवाई केली. असुन मारेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here