सकाळी मिरवणूक व दुपारी भव्य पूजन,सायंकाळी महाप्रसादचे आयोजन करण्यात आले होते
निसर्गाच्या सानिध्यात श्रीराम प्रभूचे मंदिर
सुरेश पाचभाई संपादक :- विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,
तालुक्यातील खडकी ( बुरांडा ) येथील राम मंदिरामध्ये आज दिनांक १७ एप्रिल २०२३ रोज बुधवारला श्रीराम नवमी निमित्त भव्य पूजन सोहळा संपन्न झाला. यावेळी मंदिरामध्ये मंत्रौपचाराने भगवान श्रीराम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
मारेगाव तालुक्यातील खडकी (बुरांडा) येथील टेकडीवर श्री रामाचे मंदिर असून ते निसर्गरम्य वातावरणात आहे.या ठिकाणी गेल्या अनेक वर्षाआधी प्रभु श्री रामाने मुक्काम केल्याची आख्यायिका परिसरातील वृद्ध व्यक्ती सांगतात.या ठिकाणी श्रीरामाचे धणुष्यबान व चरणपादुका आहे.या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

सकाळी मिरवणूक व दुपारी भव्य दहीहंडी पूजन,सायंकाळी महाप्रसादचे आयोजन खडकी येथील प्रभु श्रीरामच्या मंदिरात पूजा अर्चना कमिटी कडून भव्य पूजेचे आयोजन व महाप्रसादाचा कार्यक्रम करण्यात आला.यावेळी परिसरातील गावातील रामभक्त तथा नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.