उभ्या ट्रकवर दुचाकी आदळली
दुचाकीस्वार गंभीर, तीन दिवसातील दुसरी घटना

0
64

रस्त्याच्या बाजूची उभे ट्रक देत आहे अपघाताला निमंत्रण

मारेगाव ते करंजी राज्य महामार्गावरील करणवाडी जवळील पेट्रोल पंपासमोरील घटना

सुरेश पाचभाई संपादक:-विदर्भ एस.पी.न्यूज नेटवर्क मारेगाव,

मारेगाव येथील काम आटोपून आपल्या गावाकडे परत जात असतांना दुचाकी रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रकवर आदळली.यात जखमी झालेल्या युवकाचे नाव शुभम विठ्ठलराव करडभूजे वय २६ रा.बोटोनी असे आहे. ही घटना दि.२१ एप्रिलला रात्री ८:३० च्या दरम्यान घडली.यात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला असून त्याचेवर मारेगाव येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.

बोटोनी येथील शुभम हा काही कामानिमित्त मारेगाव येथे गेला होता.तेथील काम आटोपुन तो आपल्या गावाला परत येत असताना करणवाडी जवळील पेट्रोल पंपासमोर उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीने मागून धडक दिली.यात दुचाकीस्वार चालक गंभीर जखमी झाला.

अपघात घडताच रस्त्याने ये-जा करणाऱ्या काही नागरिकांनी मदत करत त्याला लगेच मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.तिथे त्याच्यावर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठवण्यात आल्याची माहिती आहे.सदर घटनेची माहिती मिळताच मारेगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून या अपघाताचा पुढील तपास मारेगाव पोलीस करीत आहे.

रस्त्याच्या बाजूची उभे ट्रक देत आहे अपघाताला निमंत्रण
सदर एरियामध्ये नेहमी उभे असणारे ट्रक हे या मार्गाने येणाऱ्या जाणाऱ्या साठी धोका बनला असून गेल्या ३ दिवसात हा दुसरा अपघात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here